pm किसान लाभार्थी यादी गावनिहाय अशी पहा ऑनलाईन !

भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी थेट त्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गावनिहाय जाहीर करण्यात येते. आज आपण PM किसान लाभार्थी यादी गावनिहाय कशी पाहावी, यासंदर्भातील सविस्तर माहिती घेणार आहोत.

PM किसान योजना काय आहे ?

PM किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्वकांक्षी सरकारी योजना असून संबंधित योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना सुरू करण्यात आली. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

लाभार्थी यादी का महत्त्वाची आहे ?

बहुतांश शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सध्यास्थितीत लाभ घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप लाभ घेतलेला नसेल, अशा नवीन शेतकऱ्यांमार्फत नोंदणी केली जात आहे. त्यामुळे यादीतून कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे किंवा कोणाचा अर्ज प्रलंबित आहे, तसेच कोणता शेतकरी अपात्र आहे, याची माहिती मिळण्यास मदत होते.

pm किसान लाभार्थी यादी गावनिहाय कशी पाहावी ?

  • सर्वप्रथम गावनिहाय पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईट उघडल्यानंतर खालीलप्रमाणे विविध पर्याय दिसतील, त्यामधील Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर तुमच्यासमोर तुमचं राज्य जिल्हा तालुका ब्लॉक व गाव निवडण्यासाठी पर्याय दाखविण्यात येतील. त्यामधील योग्य त्या पर्यायाची निवड करून Get Report या बटनावर क्लिक करा.
  • Get Report या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निवड केलेल्या गावातील पात्र शेतकऱ्यांची pm किसान लाभार्थी यादी तुम्हाला दाखवली जाईल.

Pm किसान लाभार्थी यादीमध्ये तुमच्या गावातील संपूर्ण पात्र शेतकऱ्यांची नाव दिसतील, ज्यामध्ये शेतकऱ्यांच संपूर्ण नाव व इतर आवश्यक माहिती दिसेल. अश्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील पीएम किसान लाभार्थी यादी गावनिहाय ऑनलाईन तपासू शकता.

📢 ही माहिती पण वाचा :

Leave a Comment