बांधकाम कामगार यादी ऑनलाईन अशी चेक करा

राज्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबविण्यात येतात. राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बांधकाम कामगारांना विविध काम दिली जातात. एखाद्या बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांच्या अर्जाची स्थिती किंवा बांधकाम कामगार यादीमधील नाव कश्याप्रकारे पाहता येईल, यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण संबंधित लेखात पाहणार आहोत.

बांधकाम कामगार यादी

शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांना नोंदणीकृत कामगार म्हणून संबोधता येईल. संबंधित बांधकाम विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांना online नोंदणी करावी लागते. ही नोंदणी आणि लाभ पुढे मिळविण्यासाठी दरवर्षी म्हणजेच 12 महिन्यांनी अर्ज Renew करावा लागतो.

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय राज्य शासनाकडून बऱ्याच वर्षापासून घेण्यात आलेला आहे. शासनाच्या या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ऑनलाईन नोंदणी केलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये (DBT) प्रणालीच्या माध्यमातून जमा केला जातो. संबंधित निधी कामगाराच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे कष्टकरी कामगारांना दिलासा मिळत आहे.

नवीन चालू वर्ष 2024 मधील Bandhkam Kamgar Yadi लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर तपासता येते. बांधकाम कामगार 1500 रु अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची संपूर्ण प्रोसेस खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पहावी ?

  • Bandhkam Kamgar यादी ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला येथे क्लिक करून भेट द्यावी लागेल.
  • बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट उघडल्यानंतर सर्वप्रथम मराठी भाषा निवडून घ्या.

  • त्यानंतर वरील मुख्य मेनूमध्ये “लाभ वितरीत” या पर्यायांमध्ये बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे लाभ वितरीत केल्याच्या याद्या तुम्ही पाहू शकता.

  • तुमच्या बांधकाम कामाच्या स्वरूपानुसार त्याठिकाणी योजनांची लाभार्थी यादी तुम्हाला डाऊनलोड करून Pdf स्वरूपात पाहता येईल.
  • त्यासाठी विविध योजनांच्या लाभाचे वितरण या पर्यायावर क्लिक करा.
  • एक नवीन पेजवर तुमच्यासमोर उघडेल त्याठिकाणी विविध पर्याय दिलेले असतील, ज्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडावा लागेल, त्यानंतर लाभार्थी नाव, अकाउंट नंबर व IFSC कोड टाकून तुम्ही लाभार्थी यादीत नाव तपासू शकता.
Bandhkam Kamgar Yadi

  • Search या बटनावर क्लिक केल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील संपूर्ण बांधकाम कामगार लाभार्थी यादी तुम्हाला स्क्रीनवर पाहता येईल.
  • ज्यामध्ये लाभ वितरीत करण्यात आलेली तारीख, लाभार्थ्यांच नाव, जिल्हा व रक्कम इत्यादी तपशील दिलेला असेल.

लाभार्थी यादीत नाव नसल्यास ?

वरील पद्धतीनुसार तुम्ही ऑनलाईन बांधकाम कामगार लाभार्थी यादी चेक केल्यानंतर यादीत तुमचं नाव दिसत नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला सर्वप्रथम नोंदणीची स्थिती जाणून घ्यावी लागेल, नोंदणीमध्ये काही त्रुटी आढळन आल्यास त्यानुसार तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये बदल करावा लागेल.

📢 ही माहिती पण वाचा :

Leave a Comment