महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत आता बॅटरी फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान मिळणार असून यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू झालेली आहे. फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? लागणारी आवश्यक कागदपत्र इत्यादी संपूर्ण माहिती संबंधित लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
शेतकरी फवारणी पंप योजना
महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या हस्तचलित व स्वयंचलित उपकरणासाठी अनुदान तत्वावर विविध योजना राबविण्यात येतात. आता शेतकऱ्यांना फवारणी सुलभ पद्धतीने करता यावी यासाठी 100% अनुदानावर बॅटरी फवारणी पंप दिला जाणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू झाला असून यासाठी इच्छुक शेतकरी विहित मुदतीत अर्ज करू शकतात.
पॅडकॉप बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस व सोयाबीन या पिकासाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर सर्वप्रथम नवीन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर संबंधित उपकरणासाठी खालील प्रमाणे शेतकऱ्यांनी अर्ज करावा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- जमनीचा 7/12 उतारा
- 8 अ उतारा
- शेतकऱ्यांचा आधारकार्ड
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- बँक पासबुक झेरॉक्स
- पिकांची माहिती
- मोबाईल क्रमांक
आँनलाईन अर्ज कसा करावा ?
सर्वप्रथम शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नवीन नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला युजरनेम व पासवर्ड टाकल्यानंतर फवारणी पंपासाठी शेतकरी खालीलप्रमाणे अर्ज करू शकतात.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलला भेट द्यावी. येथे क्लिक करा
- पोर्टल ओपन झाल्यानंतर नोंदणी करताना टाकलेला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन केल्यानंतर कृषी विभाग या पर्यायात पुढील अर्ज करा हा ऑप्शन निवडावा.
- त्यानंतर तुमच्याकडे कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे औषधे व खते, फलोत्पादन, सौर कुंपण इत्यादी विविध पर्याय दिसतील.
- यामधील कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोरील बाबी निवडा हा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर पुढीलप्रमाणे मुख्य घटक > कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय > मनुष्य चलित अवजारे > पीक संरक्षण अवजारे > बॅटरी संचलित फवारणी पंप> असा पर्याय व्यवस्थित निवडून जतन करा या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा अर्ज जतन केला जाईल. अर्जासाठी तुम्हाला ऑनलाईन 23.60 पैसे इतकी रक्कम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयच्या माध्यमातून भरावी लागेल.
- पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती भेटून जाईल. अर्ज केल्यानंतर पुढील काही दिवसात लॉटरी पद्धतीने तुमची निवड होईल.
- निवड झाल्यानंतर कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या बँक खात्यावरती अनुदान वितरित करण्यात येईल.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️