PM विद्यालक्ष्मी योजना – आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज, असा घ्या फायदा

PM Vidya Lakshmi Yojana : भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. आता विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं, यासाठी शासनाकडून PM विद्यालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. संबंधित योजनेद्वारे शासनाकडून 2024-2025 ते 2030-2031 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध होईल. पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, हा आहे.

PM विद्यालक्ष्मी योजना काय आहे ?

भारत सरकारकडून देशातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली PM विद्यालक्ष्मी योजना आहे. विद्यालक्ष्मी योजना देशातील उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील व पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ज्या विद्यार्थ्यांच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापर्यंत आहे, अश्या सर्व विद्यार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ मिळवता येईल. योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या सवलती आणि फायदे दिले जाणार आहेत.

पीएम विद्यालक्ष्मी योजनेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्च करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय वित्तीय संस्था किंवा बँकांकडून कर्ज मिळू शकणार आहे.

शैक्षणिक कर्जाचे विविध फायदे

  • पात्र विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळेल.
  • ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाखापर्यंत असेल, अशा विद्यार्थ्यांना व्याज सवलत दिली जाईल. आठ लाख उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 3% दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
  • संबंधित योजनेअंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध आहे, त्यामुळे आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवता येईल.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी ?

पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सरकारकडून ‘”पीएम विद्यालक्ष्मी” नावाचं ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आल आहे. संबंधित पोर्टलवर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया देण्यात आली असून विद्यार्थी त्याठिकाणी कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच विविध बँकांमधून उपलब्ध असलेले शैक्षणिक कर्जाचे पर्याय पाहू शकतात. या योजनेत अर्ज प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यावर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे.

PM विद्यालक्ष्मी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

  1. सर्वप्रथम शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विद्यालक्ष्मी योजनेची अधिकृत वेबसाईट उघडा.
  2. त्यानंतर नवीन वापर करत म्हणून प्रोफाइल तयार करा व नोंदणी करून घ्या.
  3. त्यानंतर अर्ज भरून आवश्यक ती महत्त्वाची कागदपत्र अपलोड करून घ्या.
  4. उपलब्ध कर्ज योजनांमधून तुमच्या गरजेनुसार योग्य तो कर्ज पर्याय निवडा व तुमचा अंतिम अर्ज सबमिट करा.

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

Leave a Comment